धक्कादायक! पोलीस आयुक्त कार्यालयात महिलेने जाळून घेतलं

लोकगर्जना न्यूज
बीड : मला जगण्याची इच्छा राहिली नसून माझ्या लेकरांना सांभाळा असा अर्ज पोलीस आयुक्तांना देऊन कार्यालय बाहेर पडलेल्या महिलेने पायऱ्यावरच अंगावर डिझेल ओतून घेऊन जाळून घेतले. उपस्थित पोलीसांनी आग विझवून महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केले. महिला गंभीररित्या भाजल्याचे सांगितले जात असून, भांडणात पती शेजाऱ्यांची बाजू घेतो म्हणून या महिलेनं जाळून घेतलं आहे.
सविता दिपक काळे रा. मांडवा ( ता. गंगापूर ) असे जाळून घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तीचे व शेजाऱ्यांचे नेहमीच भांडणे होतात. यावेळी पती हा शेजाऱ्यांची बाजू घेऊन मलाच मारहाण करतो. तसेच माहेर कडील मंडळींना बोलू देत नाही. यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. माझ्या लेकरांना सांभाळा असा एक अर्ज सदरील महिलेने पोलीस आयुक्त औरंगाबाद यांना दिला. अर्ज देऊन कार्यालय बाहेर पायऱ्यांजवळ येताच पिशवीत सोबत आणलेली डिझेलचा बाटली काढून अंगावर ओतून घेऊन जाळून घेतलं. सेवा बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आग विझवून महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत महिला गंभीररित्या भाजल्याचे सांगितले जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस आयुक्त कार्यालयात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरील घटना आज गुरुवारी ( दि. १ ) दुपारी औरंगाबाद येथे घडली आहे.