धक्कादायक ! पत्नीला दहा वर्ष घरात डांबलं; संशयखोर पती विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया
लोकगर्जना न्यूज
चारित्र्यावर संशय घेणाऱ्या संशय खोर पतीने स्वतः च्या पत्नीला तब्बल १० वर्षांपासून डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने बीड शहरात एकच खळबळ माजली असून सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या मदतीने सदरील महिलेची सुटका केली आहे. परंतु महिलेची प्रकृती खालावलेली असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जालना रोडवरीलर रुपाली किन्हीकर ( कुलकर्णी ) असे डांबून ठेवलेल्या महिलेच नाव असून, संशय खोर पतीचा कारनामा उघडकीस येताच अनेकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे तर अनेकजण संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कुलकर्णी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे संशयाचं भूत मानगुटीवर बसल्याने मागचा पुढचा विचार न करता पत्नीला बांधून तब्बल १० वर्ष घरात डांबून ठेवले. ही घटना डांबून ठेवलेल्या महिलेच्या बहीणीमुळे उघडकीस आली. पीडित महिलेचे बहीणीने बीड येथील ॲड. संगीता धसे यांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच ॲड. धसे यांनी शिवाजी नगर पोलीसांना सोबत घेऊन सदरील घरावर पोचल्या आतमध्ये जाऊन त्यांनी सदरील महिलेची सुटका केली. परंतु सदरील महिलेची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे त्यामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महिला सशक्त झाल्यानंतर जबाबदार नुसार पोलीस कारवाई होईल असे सांगितले जात आहे. परंतु केवळ संशयावरून ज्याला अर्धांगिनी म्हटलं जातं त्याच पत्नीला घरातच डांबून ठेवणं म्हणजे क्रुर्तेची परिसीमा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.