धक्कादायक! धारुर जवळील आरणवाडी तलावात फॉर्च्युनर कोसळली
लोकगर्जना न्यूज
धारुर : येथील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आरणवाडी साठवण तलावात फॉर्च्युनर कार कोसळल्याची घटना आता मंगळवारी ( दि. ३० ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये सुदैवाने जिवितहानी टळली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी मदत केली. धारुर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खामगाव – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी येथून जातो. या महामार्ग लगत घाटाच्या पायथ्याशी आरणवाडी साठवण तलाव आहे. धारुर येथून औरंगाबादकडे जात असलेली फॉर्च्युनर चालकाचा तलावाजवळ वाहन ओव्हरटेक करताना ताबा सुटला व कार रस्त्याच्या खाली उतरून तलावात जाऊन पडली. वाहन तलावात पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बचाव कार्य सुरू करुन दोघांना सुखरुप बाहेर काढले. कार मात्र पुर्ण पाण्यात बुडाली असल्याचे सांगितले जात आहे. तातडीने मदत केल्याने या घटनेत जिवितहानी टळली असून मदत करणाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धारुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरील कार क्रमांक व आतील प्रवाशांची नावं अद्याप समजु शकली नाहीत.