धक्कादायक! जिलेटीन काड्याचा स्फोटात वडील ठार तर मुलासह इतर एक जखमी
बीड तालुक्यातील राक्षसभुवन येथील घटना
लोकगर्जनान्यूज
बीड : विहीर खोदण्याचे काम दोन दिवसांपासून बंद असल्याने खडक फोडण्यासाठी आणलेल्या जिलेटीन काड्यांचा स्फोट होऊन यामध्ये पित्याच्या मृत्यू तर मुलगा व इतर एक असे दोघे जखमी झाल्याची घटना आज बुधवारी ( दि. २४ ) सकाळी पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील राक्षसभुवन येथे घडली आहे.
अप्पासाहेब मस्के असे मयत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या शेतात विहीर खोदण्यात येत आहे. खडक फोडण्यासाठी विहिरीमध्ये जिलेटीनचा वापर करण्यात येतो. यासाठी त्यांनी जिलेटीन काड्या आणलेल्या होत्या. परंतु दोन दिवसांपासून काम बंद असल्याने विहिरीच्या बाजुला बांधावर या काड्या झाकुन ठेवल्या होत्या. परंतु याची माहिती अप्पासाहेब यांना नव्हती त्यांनी सकाळी शेतात येऊन बांध पेटवून दिला. पेटलेला बांध पाहून मुलगा वडिलांना तेथून सरका तिथे जिलेटीन काड्या आहेत म्हणून सांगण्यासाठी जात होता. परंतु तोपर्यंत आग तिथपर्यंत पोचली व मोठा स्फोट झाला. यामध्ये अप्पासाहेब मस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा व पोकलेन चालक ( ऑपरेटर ) असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.