धक्कादायक! चक्क कोर्टाच्या आवारातच लाच स्वीकारताना महिला वकील चतुर्भुज
लोकगर्जना न्यूज
धारूर : येथील सहायक सरकारी महिला वकीलास लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत विभागाने कोर्टात रंगेहाथ पकल्याचा धक्कादायक प्रकार आज मंगळवारी ( दि. २० ) दुपारी घडला आहे. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सुरेखा लांब असे पकडण्यात आलेल्या महिला वकीलाचे नाव आहे. येथील कनिष्ठ स्तर दिवानी न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहे. या महिला वकिलाने निकालाची प्रत काढून देण्यासाठी १५०० रु. लाच मागितली. परंतु तक्रार दाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून आज मंगळवारी ( दि. २० ) सापळा लावण्यात आलं यामध्ये सदरील सहायक सरकारी वकील महिलेस १५०० रु. लाच स्वीकारताना कोर्टात रंगेहाथ पकडण्यात आले. चक्क कोर्टात लाच घेताना पकल्याची कारवाई झाल्याने धारुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लाचखोर महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रविंद्र परदेशी यांच्या पथकाने केली आहे.