कृषीप्रादेशिक

धक्कादायक! आडस येथे लंपीने बैल दगावला

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील आडस येथे लंपी स्कीन संसर्गामुळे एक बैल दगावल्याची घटना आज शनिवारी ( दि. ५ ) सकाळी उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मसने यांनी भेट देऊन पंचनामा केला.

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ आडस अंतर्गत आतापर्यंत १०४ लंपी बाधित जनावरे आढळून आली आहेत. यामध्ये रोग प्रादुर्भाव दोन केंद्र निवडण्यात आली आहेत. आडस प्रादुर्भाव मध्ये ७९ तर केकाणवाडी २५ असे १०४ बाधित जनावरे आहेत. मृत्यू हा पहिला आहे. ( दि. २९ ) ऑक्टोबरला लक्ष्मण साखरे यांची एक गाय व महादेव कारभारी खडके यांचा बैल असे दोन जनावरे लंपी बाधित आढळून आली. या दोन्ही जनावरांचे आलगीकरण करण्यात आले. मागील आठ दिवसांपासून आडसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मसने यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. परंतु तिव्र लक्षणं असल्याने महादेव कारभारी खडके यांच्या बैलाने उपचाराला साथ दिली नाही. शुक्रवारी ( दि. ५ ) सकाळी लंपी बाधित बैलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डॉ. दत्ता मसने यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यासोबतच आढळलेली गाय ही अत्यवस्थ असल्याची माहिती डॉ. मसने यांनी दिली. या आठवड्यात लाडेवडगाव येथे दोन जनावरे लंपी बाधित आढळून आली आहेत. नवीन जनावरं आढळून येत असल्याने शेतकऱ्यांच व पशुवैद्यकीय विभागाचे टेन्शन वाढलं आहे. एक बैल दगावला असल्याने खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी व कोणताही आजार असेल तर आडस येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखवावे असे आव्हान करण्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मसने यांनी केले आहे.
पाच दिवसात लंपीचा रुग्ण बरा होतो

शेतकऱ्यांनी जागरुक राहून जर जनावरे चारा खात नसतील , ताप आली असेल तर पशुवैद्यकीय दवाखाना जनावरे आणावीत. जनावरांना लंपी स्कीनची बाधा झाली असेल तर त्यावर वेळेत उपचार सुरू झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात जनावरे लंपी मुक्त होतात.
डॉ. दत्ता मसने
पशुवैद्यकीय अधिकारी,आडस

१०० टक्के लसीकरण तरीही मृत्यू

लंपी स्कीन प्रादुर्भाव रोधक लसीकरण आडस पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत १०० टक्के झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यापुर्वीच दिली आहे. लसीकरण होऊनही नवे बाधित जनावरे आढळून येते आहेत, तर आज एक बैल दगावल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »