धक्कादायक! अल्पवयीन वधूने नांदायला नकार देताच नातेवाईकांनी असे काही केले की…
लोकगर्जनान्यूज
केज : इयत्ता दहावीत असलेल्या अल्पवयीन मुलीचे इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले. या अल्पवयीन वधूने मला लग्न मान्य नाही म्हणत सासरी नांदायला नकार दिला. सासरच्या मंडळींनी हा प्रकार माहेरी कळवला. यानंतर वडील, आजोबा आणि मामाने एका गाडीत बसवून तिला अज्ञात स्थळी सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या बालविवाह प्रकरणी मुलीचे आई-वडील, आजोबा, मामा, सासू, सासरा, पती सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील मुलगी अंबाजोगाई तालुक्यातील असून तिला औरंगाबाद येथे दिले अन् लग्न केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मामाच्या गावातील शेतात लावून देण्यात आले.
बाल विवाह हा प्रकार बीड जिल्ह्यासाठी नवीन नाही. परंतु मागील काही दिवसांपासून सामाजिक संस्था, कार्यकर्ते, पोलीस आदि याबाबत दक्ष झाले आहेत. यामुळे अनेकांनी यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. परंतु बालविवाह काही थांबलेले नाहीत. ते चोरी छुपे सुरुच असल्याचे दिसून येते. असाच एक केज तालुक्यातील बाल विवाह वधू मुळे उघडकीस आला. अंबाजोगाई तालुक्यातील दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह ( दि. १६ ) फेब्रुवारी पार पडला. या बालविवाहत काही अडचण येऊ नये म्हणून मुलगी अंबाजोगाई तालुक्यातील दिली औरंगाबादेत अन् विवाह केज तालुक्यातील मामाच्या गावी शेतात लावून दिला औरंगाबाद येथील एका तरुणा सोबत लावून दिला. सदर अल्पवयीन मुलगी ही त्या विवाहास तयार नसताना बळजबरीने व धमकी देऊन तिचा विवाह लावून देण्यात आला. या लग्नाला मुलगी तयारच नव्हती तरीही तिच्या इच्छेविरुद्ध हा विवाह झाला. ती पती , सासु-सासऱ्या सोबत माहेरी गेली. तिथे जाताच तिने सासरच्या मंडळींला मला विवाह मान्य नाही. मी येथे रहाणार नाही. असे स्पष्ट सांगितले. त्यांनी ही माहिती माहेरी दिली. माहिती मिळताच वडील,आजोबा आणि मामांनी औरंगाबाद गाठून अल्पवयीन वधूला एका वाहनात बसवून नेऊन सोडून दिले. एका महिलेला हा प्रकार मुलीने सांगितला असता तिने मदत करत मुलीला पोलीस ठाण्यात आले. सदरील अल्पवयीन वधूने पोलिसांना हकीकत सांगितली असता दौलताबाद ( औरंगाबाद ) पोलीसांनी सदरील माहिती युसुफ वडगाव पोलीसांना दिली. येथे आई-वडील , आजोबा, मामा, पती,सासु ,सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा केज तालुक्यातील सहा महिन्यांतील दुसरा बालविवाह आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे हे करत आहेत.