दोन दुचाकीच्या धडकेत महिला ठार; अंबाजोगाई- कारखाना रस्त्यावरील घटना
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : शाळेतील कार्यक्रम आटोपून घराकडे परत येताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात महिला ठार तर अन्य जखमी झाल्याची घटना अंबाजोगाई-कारखाना रस्त्यावर आज शनिवारी ( दि. २ ) सायंकाळी घडली आहे. जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समजलेली अधिक माहिती अशी की, कारखाना रस्त्यावर एक इंग्रजी शाळा असून या शाळेत आज कार्यक्रम आयोजित करुन पालकांना बोलविण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून परत येताना समोरुन आलेल्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसली यामध्ये तेजश्री सोपान मोरे ( वय ३५ वर्ष ) रा. मोरेवाडी ( अंबाजोगाई ), दीर निवृत्ती मोरे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु जख्मी तेजश्री सोपान मोरे यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवर नेमके कितीजण होते याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.