क्राईम
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : तालुक्यातील चनई येथील एक तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह कळंब पोलीस ठाणे हद्दीत मांजरा नदीच्या पात्रात आढळून आला.
पवन गोचडे ( वय २७ वर्ष ) रा. चनई ( ता. अंबाजोगाई ) हा तरुण मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गुरुवारी ( दि. ९ ) काही वेळापूर्वी कळंब जवळील पुलाजवळ मांजरा नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.