प्रादेशिक
देशात तिसरी लाट ?;

दिलासा देणारी माहिती आली समोर
नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे . या व्हेरिएंटने गुरुवारी भारतात शिरकाव केला असून कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले . या बातमीने भारताचं टेन्शन वाढलं आहे. परंतु एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी माहिती समोर आली. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा पेक्षा घातक आहे. भारतात या व्हेरिएंटमुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू शकते , असे सांगितले जात असले तरी महामारी या विषयातील प्रमुख तज्ज्ञ व ‘ सेंटर फॉर डीसीज डायनॅमिक्स , इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी’चे संचालक आर . लक्ष्मीनारायण यांनी हा दावा फेटाळला आहे . त्यामुळे ओमिक्रॉनच्या दहशतीखाली असलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.