क्राईम
देवगांव रेणुका देवी मंदिराची दान पेटी फोडून रक्कम लंपास
केज : तालुक्यातील देवगांव येथील रेणुका देवी मंदिराच्या दरावाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून आतील रक्कम लंपास केल्याची घटना आज ( दि. १३ ) सकाळी उघडकीस आली. गावात खळबळ उडाली असून भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आठ वर्षांपुर्वी याच मंदिरातील दान पेटी फोडण्यात आली होती. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. आज पुन्हा अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दान पेटी फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व जमादार भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.