कृषी

दुष्काळात तेरावा! वन्यप्राण्यांच्या कळपाने पाडला चार शेळ्यांचा फडशा

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील कळमअंबा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील बांधलेल्या शेळ्यावर वन्यप्राण्यांच्या कळपाने हल्ला करुन तीन शेळ्या फस्त केल्या तर एका शेळीची नरडी फोडली. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याचे 70 हजारांचे नुकसान झाल्याने दुष्काळात तेरावा अशी अवस्था झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सरपंच शशिकांत इंगळे यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

सध्या शेतकरी आर्थिक संकटात असून, यातून बाहेर पडण्यासाठी अनेक शेतकरी शेळी पालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन हे करत आहेत. कळमअंबा ( ता. केज ) येथील शेतकरी पठाण पाशा फतरु यांचे आडस रोडवर सर्वे नंबर 522 मध्ये शेती आहे. ते शेळीपालन करतात. गुरुवारी ( दि. ३० ) रात्री सदरील शेळ्या शेतात बांधून ते काही अंतरावर झोपले होते. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक लांडग्यांनी हल्ला चढवला. तीन शेळ्या फस्त केल्या तर एका शेळीची नरडी फोडली आहे. नरडी फोडलेल्या शेळीच्या नरडीला टाके घेतले आहेत. परंतु ते वाचेल याची खात्री नसल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी ( दि. 31 ) सरपंच शशिकांत इंगळे यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला माहिती देऊन पशुधन विकास अधिकारी, तलाठी, वन विभागाचे कर्मचारी, उपसरपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »