क्राईम

दुर्दैवी घटना चिमुकलीचा…..

१४ महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह बंधाऱ्यात आढळला

नेकनूर : नांदुरफाटा ( ता. केज ) येथे १४ महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह आज ( दि .११ ) सकाळी बंधाऱ्यात पाण्यार तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेतली आहे.

अक्षरा बाबासाहेब पडूळकर ( वय १४ महिने ) असे मयत मुलीचे नाव आहे . अक्षरा ही चिमुकली कालपासूनच बेपत्ता होती . तिची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. सकाळी तिचा मृतदेह रहात्या घराशेजारी बंधाऱ्यात पाण्यावर तरंगत असलेलं आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे शेख मुस्तफा , क्षीरसागर , सानप यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यात आले.तसेच उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास सुरु आहे . हा घातपात आहे की, अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमका हा काय प्रकार आहे हे समजेल असे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »