दुर्दैवी घटना! खळखळून हसवणारा बीड जिल्ह्यातील टीक टॉक स्टार सह अन्य एकाचा करंट लागून मृत्यू
लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील भोगलवाडी येथील टीक टॉक स्टार संतोष मुंडे सह एकास करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी ( दि. १३ ) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून हसा…हसा..म्हणत आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा संतोष आज रडवून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, टीक टॉक स्टार संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे हे दोघे विद्युत रोहित्रचे फ्यूज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी या दोघांना वीजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाला. ही बातमी भोगलवाडी सह तालुक्यात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष मुंडे यांचे सोशल मीडियावर मोठे फॉलोवर असून, या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हसा…हसा… बायकोने टीक टॉक स्टारला शेळी सांभाळायला लावलीय म्हणत हसवणारा, हसत हसत ग्रामीण जनतेच्या समस्या वेशीला टांगणारा, ग्रामीण व अस्सल माराठवाड्याच्या बोली भाषेतून आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा संतोष आज चहात्यांना रडवून गेला.