दुचाकी सांभाळा! आडसच्या आठवडी बाजारातून दुचाकी चोरीला
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथे आज शनिवारी आठवडी बाजार असतो. बाजारात शेळ्या, बोकड खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्याची पॅशन प्रो दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. येथे दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या घटना पहाता दुचाकी सांभाळा असे सांगितले जात आहे.
यापुर्वी काही दिवसांपूर्वी वाघोली व आडस येथे प्रत्येकी एक असे दोन दुचाकीची चोरी झालेली आहे. त्याचा अद्याप तपास लागला नाही. आज शनिवारी ( दि. २ ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील कृषी उत्पन्न उप बाजार पेठ मधील जनावरांच्या बाजारातून पॅशन प्रो एम.एच. ०४ ई के. ९७८२ या क्रमांकाची लाल रंगाची दुचाकी चोरीला गेली आहे. अंबाजोगाई येथील शेळ्यांचे व्यापारी मजीद जब्बार कुरेशी हे येथील बाजारात शेळ्या, बोकड खरेदीसाठी आले होते. त्यांनी बाजारात दुचाकी उभी करुन खरेदीसाठी फिरत होते. अज्ञात चोरट्यांनी लक्ष ठेवून दुचाकी चोरून नेली आहे. याबाबतीत आडस येथील पोलीसांना माहिती देण्यात आली आहे. परंतु याप्रकरणी शनिवारी ४ वाजेपर्यंत पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन महिन्यांच्या आत आडस मधून दोन तर वाघोली एक अशा तीन दुचाकी आडस पोलीस चौकी हद्दीतून चोरी गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.