दुचाकी चोरांचे टार्गेट आठवडी बाजार; केज तालुक्यातील येथून दुचाकी चोरी
लोकगर्जनान्यूज
केज : वाहन चोरीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतात दिसत असून बीड जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे वाहन चोरीची घटना घडत आहेत. आता वाहन चोरांनी आठवडी बाजार टार्गेट केले का? असा संशय आडस ( ता. केज ) येथील आठवडी बाजाराचे दिवस गाठून चोरीला गेली. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी दुचाकी धारक रविवारी ( दि. 30 ) धारुर पोलीस ठाणे येथे गेले आहेत.
शनिवारी ( दि. 29 ) आडस येथील आठवडी बाजार होता. बाजारासाठी मेव्हण्याच्या नावे असलेली दुचाकी CD 100 क्रमांक MH 13 CL 3010 घेऊन विष्णू राजाराम गडदे रा. चिचखंडी हा तरुण आला. बाजारा दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गर्दी असते म्हणून विष्णू यांनी आपली दुचाकी प्राथमिक आरोग्य केंद्र समोर लावून ते भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेले. बाजार करुन परत आल्यावर दुचाकी गायब होती. इतरत्र खुप शोध घेता परंतु दुचाकी कुठे ही मिळून आली नाही. यामुळे दुचाकी चोरी झाल्याचा अंदाज आल्याने पोलीस दूरक्षेत्र येथे माहिती दिली. रविवारी ते धारुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत. यापूर्वीही येथून दुचाकी व इतर वाहने चोरी झालेली आहेत. परंतु यातील एकाही वाहनांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही.
चोरीच्या संशयावरून एक महिला पकडली
शनिवारी आडसच्या भाजीपाला बाजारात चोरी करताना एक महिला पकडली परंतु तिच्याकडे काहीच मिळून आले नाही. सहकारी दोन महिला पळून जाण्यात यशस्वी ठरल्या असून पोलीस प्रशासनाने थोडं लक्ष दिले तर बाजारातील चोऱ्या थांबतील असे मत जनतेतून व्यक्त केले जात आहे.