दिवाळी नंतर म्हणत…आजच सुरेश कुटेंचा भाजप प्रवेश
बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार?
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील उद्योजक कुटे ग्रुपच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात गगनभरारी घेणारे सुरेश कुटे दिवाळी नंतर भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. पण आजच नागपूर येथे त्यांनी प्रवेश केल्याने ही चर्चा थांबली कुटे भाजपा नेते झाले. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट व कुटे ग्रुप उद्योग समुहाचे प्रमुख सुरेश कुटे हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. यानंतर कुटे ग्रुपवर मागील काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची कारवाई झाली. यावेळी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी चर्चेत आली. तसेच कारवाई नंतर सुरेश कुटे दिवाळी नंतर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झळकल्या. यामुळे जिल्हाभरात याबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. जनता दिवाळी होण्याची वाट पहात असतानाच सुरेश कुटे यांनी आज शुक्रवार ( दि. १० ) नागपूर येथे भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. यावेळी अर्चना कुटे, आर्यन कुटे हेही उपस्थित होते. दिवाळी नंतरचा प्रवेश आजच झाल्याने खरंच भाजपमध्ये कुटे प्रवेश करणार का? ही चर्चा व उत्सुकता संपली आहे. या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु येणारं काळच ठरवेल की, नेमकं काय होणार?