दिपक हजारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड
बीड : आ.संदीप क्षीरसागर यांचे विश्वासू समर्थक दिपक हजारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी दिपक हजारे यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी, आ.संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते दिपक हजारे यांची सर्वानुमते बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मान्यतेने, जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली आहे. याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी, आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली येणार्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कामगिरी कराल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.