दारु पिऊन धांगडधिंगा करणाऱ्यांनो इकडे ही पहा! नाच गाण्यामुळे झाला लग्नाला उशीर…. वधू पक्षाने लग्नच मोडले
नवरदेवावर नवरी विना परतण्याची आली नामुष्की

लोकगर्जना न्यूज
लग्नाचा मुहूर्त दुपारचा असल्याने नवरी सजून वराची वाट पहात होती… सर्व पाहूने रावळे… मंडपात येऊन बसले होते. परंतु कमी होती नवरदेवाची.. लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी, नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही. नाचण्या गाण्यात मित्र व वर आणि वऱ्हाडी मंडळी सर्वच दंग होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नवरदेवाची वरात लग्न मंडपात पोहचली. इतका उशीर असतो का? म्हणून वधू-वर मंडळात वाद झाला आणि वधू पक्षाने लग्नच नाही करायचे म्हणून वऱ्हाडी मंडळीला चांगलेच धुवून काढून हाकलून दिले. यामुळे सकाळ पासून लग्नाचे स्वप्न पहाणाऱ्या नवरदेवाला नवरी विनाच रिकाम्या हाताने परतावे लागले तर, नात्यातील मुला सोबत नवरीचे त्याच मंडपात विवाह उरकून घेण्यात आला. या लग्नाची सिंदखेडराजा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच दारु पिऊन धांगडधिंगा करणाऱ्यांनो जरा इकडे ही लक्ष द्यावे असा टोला ही लावण्यात येत आहे.
लग्न म्हटलं की, ढोल, ताशा सध्या डिजे हे आलेच… लग्न हा आयुष्यातील एकमेव आनंदाचा क्षण असल्याने हा चांगली आठवण ठरावी म्हणून प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न करतो. परंतु काहीवेळा आनंदाच्या भरात अथवा दारुड्या मित्रांच्या आग्रहाखातर चुका घडतात व त्याची मोठी किंमत मोजावी लागते. ही आनंदाची आठवण आयुष्यभरासाठी मनाला वेदना देणारी ठरते. असाच काहीसा प्रकार सिंदखेडराजा तालुक्यात घडला आहे. याच तालुक्यातील कंडारी येथील मुलांचं तालुक्यातीलच मलकापूर पांगरा येथील मुलीशी लग्न जुळले. यासाठी ( दि. २३ ) एप्रिल दुपारी लग्नाचा मुहूर्त ठरला. त्या हिशोबाने वधू पक्षाकडून येणाऱ्या वऱ्हाडी व निमंत्रितांसाठी स्वयंपाक केला. मंडप टाकलं, वधू-वराला हळद लागली २३ एप्रिल हा दिवस ही उजाडलं. नवरी नटून थटून नवरदेवाच्या प्रतिक्षेत होती. नवरदेवाची वरात ही निघालेली होती. परंतु मद्यधुंद अवस्थेतील मित्रांचा ढोल, ताशावर नाचगाणी सुरू होती. लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी हा धांगडधिंगा काही थांबेना अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ऐकतील ते नवरदेवाचे मित्र कसे. सर्व पाहून, निमंत्रित मंडपात बसून प्रतीक्षा करून परत गेली परंतु वरात काही लग्न मंडपात पोहचली नाही. शेवटी कशी बशी रात्री ८ वाजता वराचे आगमन लग्न मंडपात झाले. उशीर झाल्यावरुन वधू-वर पक्षात बाचाबाची होऊन गोष्ट हाणामारी पर्यंत गेली. मग काय? आम्हाला मुलगी द्यायचीच नाही म्हणून पुर्ण गावाने वऱ्हाडी मंडळी चांगलीच हाताखालून काढली व नवरदेवासह सर्वांना हाकलून दिले. केवळ धांगडधिंगा यामुळे नवरदेवाला मार खाऊन, नवरी विना मोकळ्या हाताने परतण्याची नामुष्की ओढवली. यानंतर वधू पक्षाने नात्यातीलच मुलाशी त्याच मंडपात लग्न लावून दिले. तर, दुसऱ्या दिवशी त्या वराचे ही नात्यातील मुलीशी लग्न झाले. परंतु यातून एकच धडा मिळाला असून, आनंद असो की, काही ही आती झाले की, मातीच होते.