दारुच्या आहारी गेला पती बायवको अन् मुलाचा धक्कादायक निर्णय
लोकगर्जनान्यूज
बीड : पिंपरगव्हण येथे मृतदेह आढळून आला होता. बीड ग्रामीण पोलीसांनी छडा लावला, दारुच्या आहारी गेलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलाच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झाले. याप्रकरणी संशयित म्हणून मयताची पत्नी व मुलाला ताब्यात घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भागवत आश्रुबा नगदे ( वय ६० वर्ष ) रा.तांदळवाडी भिल्ल ( ता. बीड ) असे मयताचे नाव असून, यांचा मृतदेह पिंपरगव्हण येथे आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला.तपासात घरातील व्यक्तींनी खून केल्याचं तांत्रिक तपासात पुढे आले. संशयित आरोपी म्हणून मयताची पत्नी देवशाला भागवत नगदे ( वय ५५ वर्ष ) , विनोद भागवत नगदे ( वय २८ वर्ष ) मुलगा या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता दररोज दारु पिऊन येऊन भांडणं करत असल्याने त्रासाला कंटाळून खून केल्याची कबुली दिली असल्याचे वृत्त आहे. सदरील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीसांनी केला.