…. दररोज स्वतः हून सरणावर जाणारे तरुण दिसतील?
लग्न जुळत नसल्याने तरुण स्वतः चं सरणावर गेला तर बीडमध्ये अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्याला लाखांच्या बक्षीसाची घोषणा; प्रश्न घटत्या स्त्री जन्मदराचा
लोकगर्जना न्यूज
मुलींची संख्या घटत असल्याने लग्नाचं वय संपत चालले तरी मुलांना मुली मिळत नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे. हा प्रश्न किती ज्वलंत बनलं हे बुलढाणा जिल्ह्यातील घटनेवरून दिसून आले. लग्न जुळत नसल्याने शेतकरी असलेल्या तरुणाने स्वतः चं सरण रचून त्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अशी परिस्थिती असतानाही काही लोक लिंग निदान करुन गर्भातच मुलींची हत्या करत आहेत. याला रोखण्यासाठी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्याला एक लाखाच्या बक्षीसाची घोषणा केली. हे दोन्ही विरोधाभास घटना पाहून घटत्या स्त्री जन्मदराच्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
शासन बेटी बचाओ बेटी पढाओ या प्रमाणे मुलींसाठी विविध अभियान राबवून मुलींचं जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु यात यश येताना दिसत नाही. वंशाचा दिवा मुलासाठी काहीजण लिंग निदान करण्यासाठी कीतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. तसेच महाराष्ट्रात जमलं नाही तर परराज्यात जाऊन लिंग निदान करुन मुलगी असेल तर गर्भपात करत असल्याची चर्चा आहे. यामुळे घटत असलेले स्त्री जन्मदर चिंतेचा विषय बनला आहे. लग्नाचे वय निघून जात असताना ही उपवर मुलांना मुली मिळत नाही. त्यात तो शेतकरी असेल तर आणखीनच मोठी अडचण. यामुळे काय घडु शकतं हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पळशी खुर्द येथील घटनेने समोर आले आहे. येथील महेंद्र नामदेव बेलसर या ३० वर्षीय तरुणाने लग्न जुळत नसल्याने या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत स्वतः चं सरण रचून त्यात उडी मारुन मृत्यूला कवटाळले आहे. ही घटना उघडकीस येताच खळबळ माजली आहे. असे विदारक चित्र निर्माण झाले तरी स्त्री जन्मदर वाढीकडे दुर्लक्ष होत असून, बीड जिल्ह्याचाच विचार केला तर २०१९-२० या वर्षी १ हजार मुलां मागे ९६१ अशी मुलींची संख्या आहे. ही संख्या २०१२-१३ च्या तुलनेत चांगलीच असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तरीही मुलींची संख्या कमीच असल्याने बीडच्या आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे टाकत कुठे लिंग निदान अथवा अवैध गर्भपात होत असेल तर प्रशासनाला माहिती द्यावी. ही माहिती खरी निघाली तर माहिती देणाऱ्याला १ लाखाच बक्षीस देण्याची घोषणा बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केली. तसेच त्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. या वरील दोन्ही घटना पहाता खूपच विरोधाभास जाणवतो, बायको हवी आहे पण मुलगी नको. बायको मिळत नसल्याने सरणावर जाण्यासाठी मागे पुढे पहात नाही तर, मुलगी नको म्हणून पाहिजे ती किंमत मोजून व परराज्यात जाऊन तीची गर्भातच हत्या करण्यास कचरत नाहीत. त्यामुळे बाबांनो बायको, प्रेयसी, आई, बहीण पाहिजे असेल तर त्यासाठी प्रथम मुलगी पाहिजे हे लक्षात ठेवावे लागणार आहे. अन्यथा स्वतः सरणावर जाणारे तरुण आपल्याला दररोज दिसतील? अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करत आहेत.