‘त्या’ मजुरांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख;मुख्यमंत्र्यांची घोषणा
लोकगर्जनान्यूज
परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ जवळ शेतात सेफ्टी टँकची सफाई करताना पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ( दि. ११ ) रात्री घडली आहे. त्या ममतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये मदतीची तसेच प्रकृती चिंताजनक असलेल्या मजुराचा उपचार खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
भाऊचा तांडा सोनपेठ ( जि. परभणी ) येथे शेतात सेफ्टी टँकची सफाई करताना शेख सादेख रहिम ( वय ४८ वर्ष ), शेख शाहरुख सादेख ( वय २२ वर्ष ), शेख नवीद दाऊद ( वय २३ वर्ष ), शेख जुनेद दाऊद ( वय २५ वर्ष ), शेख फेरोज गफ्फार ( वय १८ वर्ष ) या पाच मजुरांचा मृत्यू झाला तर, शेख जमीर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर परळी येथे एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत हातावर पोट असलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी तातडीने मोठा निर्णय घेतला. मयत मजुरांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये मदतीची घोषणा केली. तसेच याच घटनेतील जखमींवर उपचार शासकीय खर्चातून उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.