‘त्या’ घटनेचे धक्कादायक कारण समोर वैतागवाडी दांपत्य आत्महत्या प्रकरण
नेकनुर : बीड तालुक्यातील वैतागवाडी येथील दांपत्याने आत्महत्या केल्याचे गुरुवारी ( दि . 17 ) प्रथम दर्शनी समोर आले होत. आज मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आले. पतीने पतीस ठार करून स्वतः आत्महत्या केल्याचे धक्कादायक कारण समोर आले.
नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वैतागवाडी येथे राजेश जगदाळे ( वय -२५) , पत्नी दिपाली राजेश जगदाळे ( वय -२० ) या ११ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले होते. हा आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात होते. परंतु आज शुक्रवारी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल आले आहेत. यातून पतीने गळा दाबून पत्नीला ठार करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले. हा प्रकार पती-पत्नीच्या वादातून घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.