‘तो’ झाड बेडूक! जास्त पाऊस झाल्यास बाहेर पडतो: प्राणीमित्राची माहिती

लोकगर्जना न्यूज
बीड : केज तालुक्यातील आडस येथे आढळलेला दुर्मिळ पांढरा बेडूक यास झाड बेडूक म्हणतात. तो जास्त पाऊस झाल्यास बाहेर पडतो अशी माहिती शिरुरचे प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली.
आडस येथे उमेश आकुसकर यांना त्यांच्या शेतातील लिंबुनीच्या बागेत पांढऱ्या रंगाचं दुर्मिळ बेडुक आढळून आला. याची आडस परिसरात चर्चा सुरू झाली. याची दखल घेऊन लोकगर्जनान्यूज ( lokgarjananews.in) ने सर्व प्रथम बातमी प्रसिद्ध केली. याची दखल अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांनी घेतली. पांढरा बेडूक हा काय प्रकार? नैसर्गिक रित्याच पांढरा आहे की, बदलत्या वातावरणामुळे बेडकाचं रंग बदलला अशी चर्चा सुरू झाली. परंतु याबाबत शिरुर येथील प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे यांनी एका वृत्तपत्राला माहिती देऊन हा यावरील पर्दा उठवला असून, सोनवणे यांनी म्हटले आहे की, तो बेडूक नैसर्गिक रित्याच पांढरा असतो. त्यास झाड बेडूक म्हणून ओळखले जाते. हा बेडूक सहजपणे झाड, भिंत, शेतातील विजेच्या खांबावर चढू शकतो. हा पांढरा बेडूक पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास बाहेर पडतो अशी माहिती दिली आहे. तसेच हा पांढरा बेडूक त्यांच्या सर्वराज्ञी प्रकल्पाच्या परिसरात दिसून येतात असे सांगितले आहे. तर, अंबाजोगाई येथील पत्रकार रोहिदास हातागळे यांनी ही सांगितले की, मांजरा नदीच्या काठावर पांढरे व सोनेरी रंगांचे बेडूक मोठ्या प्रमाणात आढळतात.