शिक्षण संस्कृती
तेलगाव सरस्वती विद्यालयाचा 94 टक्के निकाल
लोकगर्जनान्यूज
तेलगाव : येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी एसएससी बोर्ड परीक्षेचा शाळेचा निकाल 94.33 टक्के इतका लागला आहे.
लगड पौर्णिमा कमलाकर 92.80 टक्के मार्क घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. द्वितीय धुमाळ वैष्णवी प्रमोद 92.20 टक्के तर तिडके विश्वजित रामचंद्र 90.80 टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्या डॉ. दिपा क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक लगड, विद्यालयाचे प्राचार्य शिंदे व्हि.आर., पर्यवेक्षक चवार बी.एस. सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.