क्राईम
तेलगाव जवळ भीषण अपघात; दोन ठार एक गंभीर
बीड : धारुर तालुक्यातील तेलगाव जवळील पेट्रोल पंप जवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ठार ,एक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार एका झाडावर धडकली. धडक इतकी जोरात होती की, कारचा चेंदामेंदा झाला. यामध्ये दोघे ठार झाले असून मयत नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला दवाखान्यात पाठवले.