तूर उत्पादनात घट होणार? जाणकारांचे मत काय?

लोकगर्जना न्यूज
यावर्षी सततचा पाऊस त्यामुळे मर, बुरशी अशा विविध रोगांचा तूरीवर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी तूरीच्या उत्पादनात मोठी घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु भाव वाढतील की, नाही हा अंदाज आत्ताच बांधता येणार नाही. तरीही शेतकऱ्यांनी तूर विक्री करण्या अगोदर बाजारातील दरांचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा असे आवाहन जाणकार करतं आहेत.
खरीप हंगामातील सर्वात शेटचे पीक तूर आहे. हे पीक आता बाजारात येण्यास सुरु झाले. आवक वाढताच तूरी दरात काहीशी घसरन झालेली दिसून येत आहे. तसेच हमीभाव केंद्रही सुरू झाली असून काही ठिकाणी सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे दरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. यंदा देशात तूर पिकाला सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळं मोठा फटका बसलाय. त्यामुळं उत्पादन ३० ते ३५ लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. तसंच यंदा तूर आयात ४ लाख २७ हजार टनांवर पोचल्यानं एकूण पुरवठा ४० लाख टन होण्याचा अंदाज आहे. परंतु देशाची गरज ४३ लाख टनांची असूनही दर हमीभावाच्या आसपास राहतील असा अंदाज आहे. आपल्याकडे अंतर पीक म्हणून सर्वाधिक तूरीला पसंती देण्यात येते त्यामुळे कर्नाटक नंतर महाराष्ट्र देशातील तूरीचे उत्पादन घेणारं राज्य समजला जातो. या दोन्ही राज्यात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. गतवर्षी महाराष्ट्रात ११ लाख ७८ हजार टन तूरीचे उत्पादन झाले. यावर्षी १० लाख ८४ हजार टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. कर्नाटक राज्यात १२ लाख ३८ हजार टन उत्पादन झाले. यावर्षी १२ लाख हजार टन इतके उत्पादन होईल असा अंदाज आहे. देशाचा विचार केला तर गरज ४३ लाख टनांपर्यंत असून उत्पादन मात्र ३० ते ३५ लाख टन होईल असे जाणकारांचे अंदाज आहेत. मागणी आणि उत्पादनात तुट रहाणार आहे.