तुम्ही पासबुक तपासलं का? दुसऱ्या टप्प्यात ७६ कोटी पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने खरीप हंगाम २०२३ मध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. याची भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यात २४१ कोटी २५ टक्के अग्रीम वाटप करण्यात आला. परंतु तरीही अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान भरपाई मिळाली नाही. याबाबत मोठी ओरड झाली. परंतु राज्याचे कृषिमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले असून १ लाख ११ हजार ६०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७६ कोटी २७ लाख रु. विमा जमा झाला.
मागील खरीप हंगामात पेरण्या पूर्ण होऊन पिकं उगवताच जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात पावसाचे दडी मारली. यामुळे पिकांची वाढ मंदावली अन् शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाई म्हणून २५ टक्के अग्रीम देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी बैठका घेऊन अनेक महसूल मंडळात शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीमची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. याला विरोध करत सरसकट अग्रीम देण्याला हरकतीय अपील केले. यामुळे जिल्ह्यात विमा कंपनी विरोधात असंतोष पसरला होता. सदर आपली जिल्हा प्रशासन, राज्य तांत्रिक सल्लागार समिती, आयुक्त या तिन्ही ठिकाणी आपली फेटाळून लावला. यामुळे पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये २४१ कोटी अग्रीम वाटप करण्यात आला. परंतु अनेक शेतकरी यापासून वंचित होते. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. संबंधित यंत्रणा सोबत सातत्याने बैठक घेऊन विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ६०१ शेतकऱ्यांना ७६ कोटी २७ पीकविमा रक्कम मिळवून घेतली.शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. काल धारुर तालुक्यातील कोळपिंपरी येथील काही शेतकऱ्यांचा खात्यावर रक्कम जमा झाली. यावर्षी खरीप हंगामात उत्पन्न घटले तर पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने रब्बी हंगामातही काही हाती लागले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु या पीकविमा नुकसान भरपाईमुळे काहीअंशी दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
तालुका निहाय रक्कम
तालुका शेतकरी रक्कम
आष्टी २५३५ १ कोटी ४९ लाख
अंबाजोगाई १२३९१ १२ कोटी ३६लाख
बीड ७१७१ ५ कोटी २२ लाख
धारुर ३५४१ ३ कोटी ८६ लाख
गेवराई ५४४६ ३ कोटी ४४ लाख
केज १९१२५ १३ कोटी ७ लाख
माजलगाव १९०२७ १४ कोटी१३ लाख
परळी २५१५५ १६ कोटी ५७ लाख
पाटोदा ८८७७ ३ कोटी ९० लाख
शिरुर का. २९३२ ६२ लाख ८५ ह.
वडवणी ५४०१ १ कोटी ४७ लाख