राजकारण

‘ती’ मदत कशी विसरावी म्हणून आमचा पाठिंबा मुंदडा यांनाच

लोकगर्जनान्यूज

अंबाजोगाई : कोणतीही अडचण असो हक्काचा आधार मिळतो तो मुंदडा कुटुंबाकडेच मग ते कोरोना काळातील बेड असो की, शेतातली जळालेली डीपी अन् अपघाताची घटना आणि जिवाभावाची माणसे दूर अशा कोणत्याही संकटात एक मुंदडा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला फोन केला की, टेन्शन फ्री होत. यामुळे मतदारसंघात जनता म्हणतेय ‘ती’ मदत कशी विसरावी म्हणून आमचा पाठिंबा विकसनशील आमदार नमिता मुंदडा यांनाच यामुळे त्यांचा विजय कोणीच रोखू शकत नाही असे चित्र दिसून येत आहे.

नेते, कार्यकर्ते, भाषणांमध्ये चांगुलपणा सांणाऱ्यांची कमी नाही. पण अत्यंत सामान्य माणसाच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. जेंव्हा सामान्य माणूस अडचणीत असतो तेव्हा तो फोन करतो तेव्हा लक्षात येतं की, कोण फक्त बोलतो अन् कोण कामाला येतं, असंच कामाला येणार मुंदडा कुटुंब आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा असो की, आमदार नमिता मुंदडा या कुटुंबाने जनसेवेचा वसा घेतलेला आहे. कोणतेही संकट असो हे कुटुंब नेहमीच जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असते, कोरोना या काळात माणूस माणसा पासून दूर पळत होता, दवाखान्यात गेले तर बेड मिळत नव्हते की, उपचार मिळत नव्हते तेंव्हा हे कुटुंब मतदारसंघातील जनतेला उपचार मिळावेत म्हणून धावपळ करीत होते. लोखंडी सावरगाव येथील दवाखान्यात सर्वात मोठे कोविड सेंटर सुरू केले. मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी अन् विलगीकरण कक्ष स्थापन केले. उपचार आणि इतर सुविधा कशा मिळतील यासाठी जग थांबलेले असताना हे कुटुंब धावत होता. यावेळी केलेली मदत असेल की, शेतातील डीपी जळाल्याने पिके पाण्याअभावी जळत असताना रात्री एक फोन नंदकिशोर मुंदडा यांना केला अन् सकाळी शेतात डीपी हजर, तसेच दवाखान्याची अडचण कधीच येत नाही. तसेच कुठं कोणाचा अपघात घडला जिवाभावाची माणसे सोबत नसतात अशा वेळी मदतीला नंदकिशोर मुंदडा धावून जातात. असे असंख्य माणसं भेटतील की, नंदकिशोर मुंदडा यांनी आम्हाला अमूक अमूक मदत केली होती असे सांगतात. यामुळे केज मतदारसंघात प्रचाराला येणाऱ्या इतर उमेदवारांना मतदारच प्रश्न विचारत आहेत की, ‘ती’ मदत कशी विसरावी? यामुळे आमचा पाठिंबा आमदार नमिता मुंदडा यांना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »