तीन दिवसांत रोहित्र बसवण्याचा दावा करणाऱ्या महावितरणकडून १० दिवसांपासून किटकॅट मिळेना
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील एका डिपीचे किटकॅट ( फ्यूज ) तुटलं आहे. त्यासतारेने बांधून विजपुरवठा सुरू ठेवला परंतु यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असून मागील १० दिवसांपासून दोरीगंड्यावर काम सुरू आहे. १० दिवसांत किटकॅट पुरवू न शकणारी महावितरण कंपनीत तीन दिवसांत जळालेल्या ठिकाणी तीन दिवसांत नवीन रोहित्र बसवण्याचा दावा करते हे विशेष आहे.
महावितरण कंपनीने मागील काही दिवसांपूर्वी जिल्हानिहाय काही मोबाईल नंबर जाहीर करत जळालेल्या रोहित्र बाबत सदरील नंबरवर माहिती दिल्यास तीन दिवसांत रोहित्र बदलून मिळेल असा दावा केला. याचा मोठा गवगवा केला. पण आडस ( ता. केज ) येथे या विरुद्ध प्रकार दिसून येत असून येथील गावातील वयराट डिपीवरील एक किटकॅट जवळपास १० दिवसांपूर्वी फुटला आहे. येथे बसविण्यासाठी नवीन किटकॅट मिळत नसल्याने या किटकॅट ( फ्यूज ) वरील विजपुरवठा बंद पडून ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी चक्क तारेने बांधून विजपुरवठा सुरू ठेवला आहे. परंतु १० दिवस झाले तरी किटकॅट मिळत नाही. किटकॅट नसल्याने या पेजच्या सिंगल फेज रोहित्रला धोका निर्माण झाला. महावितरण कंपनी ग्रामीण भागातील विजपुरवठा व साहित्य पुरवठ्यासाठी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे आडस येथील घरगुती वापराची वीजबिल वसुली ९० टक्के पेक्षा जास्त आहे. तरीही येथील अशी अवस्था असून साधे साहित्य मिळत नसल्याने येथील विजपुरवठा सतत बंद पडत आहे.