तीन ट्रेनचा भीषण अपघात; 200 पेक्षा जास्त प्रावाशांचा मृत्यू 900 जखमी
लोकगर्जनान्यूज
ओडिसातील बालासोर येथे शुक्रवारी रात्री तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये 233 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 900 प्रवाशी जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
15 वर्षातील सर्वात मोठ्या अपघात पैकी ही घटना असून, बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचे बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ डब्बे ट्रॅकवरून उतरले. या डब्यांवर शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस धडकली यामुळे याही गाडीचे डब्बे घसरुन मालवाहू ट्रेनवर धडकले. अशा या तीन ट्रेनचा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर एकचं कल्लोळ माजला. रात्री पासून अद्यापपर्यंत बचाव कार्य सुरू आहे. डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना व मृतदेहाना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बचाव कार्य करणाऱ्या पथकांना गॅस कटरचा वापर करुन प्रवाशांना काढावं लागतं आहे. या अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची व 900 प्रवासी जखमी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी कोणाचा पाय तर कोणाचा हात तुटला आहे. या भीषण घटनेने देश सुन्न झाला आहे.