….. तर वारसांना मिळणार 25 लाख….काय आहे शासन निर्णय वाचा
लोकगर्जनान्यूज
महाराष्ट्र शासनाने काल एक निर्णय जाहीर केला असून यामुळे सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर हा निर्णय काय ? सविस्तर बातमी वाचा
अनेकवेळा शेतात काम करताना शेतकरी, शेतमजुर यांच्यावर वन्य प्राणी हल्ला करतात. यामध्ये कधी जीव जातो, अथवा गंभीर जखमी होऊन अपंगत्व येते. याबाबत शासनाकडून म्हणावी अशी मदतही मिळत नाही. त्यामुळे या सर्वसामान्य शेतकरी व मजुरांच्या कुटुंबाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. परंतु महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या कालच्या निर्णयामुळे आता या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत माहिती दिली. वन्यप्राणी जसे बिबट्या, वाघ, अस्वल, तरस,गवा,लांडगा, रानडुक्कर, कोल्हा, मगर, हत्ती, रान कुत्रा, गवा ( नीलगाय), माकड,वानर या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या मनुष्याचा मृत्यू, गंभीर जखमी, कायमचं अपंगत्व, किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये मृत्यू झालेल्या मनुष्याच्या वारसांना 25 लाख, कायमचे अपंगत्व 7 लाख 50 हजार, गंभीर जखमी 5 लाख व किरकोळ जखमीला उपचारासाठी खर्च तसेच जर एखाद्या किरकोळ जखमी व्यक्तीवर खाजगी दवाखान्यात उपचार करणे आवश्यक असल्यास 50 हजार असा निर्णय घेतला गेला. यामुळे सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.