क्राईम

…… तर ट्रक-बसचा अपघात टळला असता?

 

पुढारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनो उघडा डोळे बघा नीट?

अंबाजोगाई : अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर सायगाव जवळ असलेल्या नंदगोपाल डेअरी जवळील धोक्याच्या वळणावर ट्रक व बसची धडक होऊन भीषण अपघात घडला. यामध्ये चौघांना आपला जीव गमावला आहे तर, पंधरा जण जखमी असून मयतामध्ये एसटीच्या वाहकाचाही समावेश आहे. लातूर जिल्हा हद्द पर्यंत या रस्त्यावर दुभाजक आहे. तसेच दुभाजक पुढेही असते तर कदाचित हा अपघात टळला असता अशी चर्चा करण्यात येत असून जनतेच्या मागणीकडे जिल्ह्यातील पुढारी आणि संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.

लातूर-कारखाना- लोखंडी सावरगाव फाटा असा हा मार्ग आहे. यावर लातूर पासून बीड जिल्ह्याच्या हद्दी पर्यंत रस्त्यावर दुभाजक आहे. यापुढे दुभाजक नसल्याने अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्हा हद्दीतील रस्त्यावर ही दुभाजक टाकण्यात यावे अशी जनसामान्यांची मागणी असून याबाबत अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित केल्या आहेत. परंतु याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने अपघाताच्या घटना सुरूच आहेत. आज रविवार सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची औरंगाबाद डेपोची बस क्र. एम.एच. २० बी.एल. ३०१७ व मालवाहतूक ट्रक क्र. के.ए. ५ इ ५४९४ या दोन्ही वाहनांची सायगाव ते बर्दापूर दरम्यान नंदगोपाल डेअरी जवळ धोक्याच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती की, दोन्ही वाहने समोरुन चक्काचूर होऊन एकमेकात घुसली. यांना वेगळं करण्यासाठी क्रेनचे सहाय्य घ्यावे लागले. या भीषण अपघातात १) आदिल सलीम शेख (आंबजोगाई), २) चंद्रकला मधुकर पाटील (वाहक) (कांचनवाडी, औरंगाबाद), ३) नलिनी मुकुंदराव देशमुख, (ज्योतीनगर औरंगाबाद), ४) सादेक पटेल (राडी नगर लातूर) या चौघांचा मृत्यू झाला. जखमी मध्ये १) सुंदरराव ज्ञानोबा थोरात (पांगरी ता. धारूर), २) हरिनाथ रघुनाथ चव्‍हाण (लातूर), ३) अल्लाउद्दीन अमीर पठाण (निलंगा), ४)अरेमत तालीम पठाण (लातूर), ५) जियान फईम पठाण (लातूर), ६) भागवत निवृत्ती कांबळे (लातूर), ७) योगिता भगवंत कदम (लातूर), ८) दस्तगीर आयुब पठाण (निलंगा), ९) प्रशांत जनार्दन ठाकूर (शेंडी), १०) सुभाष भगवान गायकवाड ( पिंपळगाव), ११)आयान फईम पठाण (लातूर), १२)माधव नरसिंगराव पठारे (जालना)१३)बळीराम संभाजी कराड (खोडवा सावरगाव) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर दुभाजक असते तर हा अपघात टळला असता पण करणार कोण? असा संतप्त सवाल विचारला जातो आहे. लातूर हद्दीत दुभाजक होऊ शकतो तर पुढे का नाही? असा प्रश्न उपस्थित करत पुढाऱ्यांनो उघडा डोळे बघा नीट! असा सल्ला जनतेतून दिला जातो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »