तरुणीचा विनयभंग; केज तालुक्यातील घटना
केज : घरात एकटी तरुणी असल्याची संधी साधून एका नराधमाने घरात घुसून वाईट हेतूने तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात उघडकीस आली.
केज तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीचे वडील ड्रायवहार असून ते साखर कारखान्यावर कामाला गेले आहेत. दि. ८ जानेवारी रोजी आई ही नातेवाईकाकडे बाहेरगावी गेले होती. घरी पीडित तरुणी व तीचा भाऊ दोघे होते. दि. ९ जानेवारी रविवार रात्री ३:०० च्या सुमारास तिचा भाऊ लघुशंकेसाठी गेला. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून तेवढ्यात नराधम अक्षय संतोष जंगम हा घरात घुसून तरुणीचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. अंगावरील कपडे फाडले, अंगाशी झटपट करत असल्याने पिडीतेने मदतीसाठी भावाला बोलविले असता; त्या नराधमाने तू मला होकार दे; नसता तुझ्या भावाला जीवे मारून टाकील अशी धमकी दिली. पिडीतेच्या भावाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो ज्वारीच्या शेतात पळून गेला. त्यावेळी त्याच्या सोबत इतर अनोळखी दोन इसम होते. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अक्षय संतोष जंगम आणि त्याचे साथीदारां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या महिला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.