तरुणाने अल्पवयीन मुलीला विष पाजले…. धक्कादायक कारण आले समोर
लोकगर्जना न्यूज
लग्न लावून देण्यास मुलीच्या आई-वडीलांनी नकार देताच तरुणाने अल्पवयीन मुलीला विष पाजल्याची घटना गेवराई तालुक्यात उघडकीस आली. मुलीवर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची चर्चा आहे. घटना उघडकीस येताच बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील गावातील ही घटना असून, आई-वडील ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्याने सदरील मुलगी चुलत्याकडे रहात होती. दरम्यान गावातील एक तरुण मुलीची नेहमीच छेड काढत असे, काल रात्री या मजनुने कहरच केला. साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुलीच्या घरी जाऊन तीचे माझ्या सोबत लग्न लावून द्या अशी मागणी केली. मुलीचे शिक्षण सुरू असल्याने तसेच तीचे वय १६ वर्ष असल्याने आई-वडिलानी लग्नास नकार दिला. नकार देताच मजनुने घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मुलीला विष द्रव्य पाजले. कुटुंबाने तातडीने मुलीला बीड येथे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे मुलीवर उपचार सुरू आहेत. हा धक्कादायक प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याची चर्चा आहे.