तरुणांनो लागा तयारीला! कृषी सेवक पद भरती सुरू: अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा
लोकगर्जनान्यूज
कृषी पदविका व पदवीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. शासन कृषी सेवकांची 952 पदे भरणार असून सध्या यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे तरुणांनो तयारीला लागा असा सल्ला देण्यात येत आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासाठी राज्य कृषी विभाग रिक्त पदे भरणार आहे. यामध्ये कृषी सेवकांची 952 इतके पदे भरली जाणार आहेत. यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. यामुळे कृषी पदवी अथवा पदविका घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलातर ही उत्तम संधी आहे. यामुळे कृषी पदवी अथवा पदविका घेतलेल्या तरूणांनी कृषी सेवक पदाचे ऑनलाईन अर्ज भरुन परीक्षेच्या तयारीला लागावे असे आवाहन जेष्ठ मंडळींकडून केले जात आहे. या जागा लातूर 170, औरंगाबाद 196, नाशिक 336, अमरावती 156, कोल्हापूर 250, पुणे 182, ठाणे 247, नागपूर 365 या प्रमाणे जिल्हानिहाय पद भरती होणार आहे. यासाठी पगार प्रति महिना 16 हजार निश्चित वेतन जाहीर करण्यात आले. ही नेमनूक प्रथम एक वर्षांसाठी असून काम पाहून नंतर दोन वर्ष वाढवून देण्यात येणार आहेत. कृषी सेवकाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असणार आहे.