तरुणांना सुवर्ण संधी पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ
राज्यात 17471 पोलीस पद भरती होणार
लोकगर्जनान्यूज
बीड : महाराष्ट्र राज्य सरकार 17471 पोलीसांची भरत करत असून याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 5 ते 31 मार्चपर्यंत वेळ देण्यात आली होती. परंतु यात बदल करुन इच्छुक उमेदरांना अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. राज्यातील तरुणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यात करण्यात येणाऱ्या या पोलीस भरती ची मुदतपूर्वी पाच ते 31 मार्च पर्यंत देण्यात आली होती मात्र आता मराठा आरक्षणासाठी या पोलीस भरतीला 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून उमेदवारांना वाढीव तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. मराठा समाजाच्या युवकांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा व कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवर पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. मराठा आरक्षण विधेयक संमत करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या नव्या आदेशानुसार सर्वच भरती प्रक्रियेत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. मराठा समाजाच्या युवकांनी ही मुदत वाढीची मागणी केली होती. भरतीच्या सविस्तर माहितीसाठी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करता येईल. आतापर्यंत ज्यांना अर्ज करता आला नव्हता ते उमेदवार आता www.police recruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
विशेष प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही कागदपत्रे आवश्यक
या भरतीसाठी विशेष प्रवर्गातून लाभ घेणाऱ्या उमेदवारांकरिता दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, एमएससीआयटी पास असल्याचे प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथ असल्यास प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, ईडब्ल्युएस प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र यासारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
पोलीस भरतीत या पदांचा समावेश
राज्यात पोलीस कॉन्स्टेबल 9545, चालक 1686, तुरुंग कॉन्स्टेबल 1800, सशस्त्र पोलीस शिपाई 4349, पोलीस बॅट्समन 412 तर औरंगाबाद साठी लोहमार्ग पोलीस 80, ग्रामीण पोलीस 126, चालक 21, पोलीस शिपाई 212, तुरुंग कॉन्स्टेबल 315 आदी पदे भरण्यात येणार आहे.