डॉ. विजयप्रकाश ठोंबरे सन्मानित
लोकगर्जनान्यूज
केज : लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सुतगिरणीचे संस्थापक चेअरमन प्रा. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांना माजलगाव येथे संत रविदास महाराज आणि संत कंकय्या महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहकार सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
प्रा. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांचे सामाजिक, कृषी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना संत शिरोमणी गुरू रविदास महाराज व संत कंकय्या महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने माजलगाव येथील आयोजित भव्यदिव्य कार्यक्रमात आमदार प्रकाश प्रकाश सोळंके, बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते सहकार सेवा पुरस्कार देऊन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांना गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासघाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच डॉ. ठोंबरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.