डॉ.योगेश क्षीरसागर जनतेचे सेवक म्हणून काम करतील – सारिकाताई क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)
दि.८ : बीडचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेचे सेवक म्हणून पुढील ५ वर्ष काम करतील, असे प्रतिपादन डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ त्यांच्यासह पत्नी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात झंजावाती प्रचार दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी (दि.८) डॉ.सरिकाताई क्षीरसागर यांनी पाली व चौसाळा जिल्हा परिषद गटातील विविध गावात जाऊन संवाद साधला.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी नाळवंडी जिल्हा परिषद गटातील अंतरवन पिंपरीसह तांडा, खांडे पारगाव फाटा, नागपूर बुद्रुक, नागापूर खुर्द, उमरी, उमरद खालसा, म्हाळसजवळा, मासापूर, पिंपळगाव, ईट, गंगनाथवाडी, बाभूळवाडी, बेलवाडी या गावांच्या एकत्रित चार बैठका घेतल्या. तसेच, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी पाली व चौसाळा जिल्हा परिषद गटातील समनापूर, कोल्हारवाडी, आहेरवडगाव, कर्जनी, कपिलधारवाडी, मांडवजाळी, धनगरवाडी, करचुंडी, कोळवाडी, साखरे बोरगाव, गोगलवाडी, खडकीघाट, तांदळवाडी घाट, हिंगणी खू., चांदेगाव, पालसिंगण, चांदणी, चौसाळा, वाढवणा, मानेवाडी, रुईघवन, माळेवाडी, चौसाळा, घारगाव देवी, बाबुळगाव, हिंगणी बु, सुलतानपूर, गोलंगरी लोणी घाट, वडवाडी यासह इतर गावांची एकत्रित बैठक घेऊन ग्रामस्थांची संवाद साधला. या दौऱ्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले.