डॉ .भाऊसाहेब चाळक यांनी आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा मानली – ह.भ.प.भगवान महाराज शास्ञी
डॉ .चाळक यांचा सेवानिवृती समारंभ विविध आठवणींनी रंगला...!
लोकगर्जनान्यूज
केज : मानवी जीवन विविध खडतर प्रसंगानी भरलेले असते.त्याला धैर्य,चिकाटी व सातत्य ठेवुन जीवन यशस्वी करता येते. डॉ.भाऊसाहेब(दिलीप) चाळक यांनी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेवुन त्यांनी त्या काळात एम.बी.बी.एस. होवुन आपल्याच मायभुमीत वैद्यकीय अधिकारी म्हणुन सेवा बजावली. ग्रामिण भागातील रुग्नांची सेवा केली.स्ञी रोग तज्ञ म्हणुन ख्याती मिळवली. त्याच बरोबर शेवटच्या उतरार्धात गडचिरोली सारख्या आदिवासी भागात ही सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली.केज ग्रामिण रुग्णालयातुन प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणुन ते सेवा निवृत्त झाले आहेत असे प्रतिपादन
ह.भ.प.भगवान महाराज शास्ञी वरपगांवकर यांनी केले.
ते सेवानिवृती समारंभात आपल्या सुश्राव्य किर्तनात बोलत होते.
भगवान महाराज शास्ञी पुढे म्हणाले की कोणत्याही सेवेपेक्षा रुग्णसेवा महत्वाची ठरते.रुग्णाला जीवदान देणे हे पुण्य खुप मोठे आहे.
, या सेवा गौरव कार्यक्रमात अॕड.सपाटे यांनी ही कार्याचा गौरव करत राहिलेल्या आयुष्यातही रुग्णसेवा करावी असे सांगितले.डॉ.बी.जे.हिरवे यांनी ही या कार्यक्रमात डॉ.चाळक यांच्या गेल्या तेवीस वर्षाचा रुणानुबंध मांडला.
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती अक्षय भैया मुंदडा, डा.विजयप्रकाश ठोंबरे डॉ.ओमप्रकाश ठोंबरे,डॉ.वासुदेव नेहरकर यांची होती.
या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत,डॉ.सोळंके,डॉ.करपे,
डॉ.सावंत,डॉ.इंगोले,
हर्ष क्लिनिकचे डॉ.ठोंबरे ,डॉ.मुंडे(धारुर) डॉ.दामा (अंबाजोगाई),महादेव सुर्यवंशी
रोटरीचे हनुमंत भोसले,अंजान साहेब पञकार धनंजय देशमुख,अशोक सोनवणे व केज शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.