डेअरी वर जातो म्हणून बाहेर पडलेला युवक घरी परतलाच नाही; आईची पोलीसात धाव
केज : येथील ३० वर्षीय युक गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दूध डेअरीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. तो अद्याप घरी परतला नसून त्याचा काही थांगपत्ता लागत नसल्याने आईने पोलीसात धाव घेतली आहे.
दिलीप नरसिंग चौरे ( वय ३० वर्ष ) रा. उमरी फाटा, बीड रोड केज असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ‘तो’ गुरुवारी ( दि. ३ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुध डेअरीवर जातोय असे सांगून जेवण करण्यासाठी सोबत डब्बा घेऊन घेऊन घराबाहेर पडला. इश्वर चाळक, महादेव चौरे, शेख सलीम यांच्या सोबत डेअरी वर जेवणं केले. डब्बा सोबत घेवुन गेला. त्याने डेअरीवर महादेव चौरे, सलीम शेख, इश्वर चाळक यांनी मिळून जेवन केले. परंतु रात्री व उशीरा पर्यंत घरी आला नाही. रात्री उशिरापर्यंत ही दिलीप न आल्याने आईने फोन केला परंतु फोन उचलला नाही. सकाळी पर्यंत घरी पोचला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला परंतु काहीएक थांगपत्ता लागत नसल्याने चिंतेत असलेल्या आई रुक्मिणी नरसिंग चौरे यांनी केज पोलीस ठाणे गाठून दिलीप बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तपास बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत. नाव दिलीप चौरे उंची ५ फुट ९ इंच, रंग गोरा, अंगात पांढरा चौकडे असलेला शर्ट, पायात चप्पल असे वर्णन आहे. कोणाला हा युवक आढळून आला तर केज पोलीसांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.