डी. डी.ओ. कोड साठी प्रा.ईश्वर मुंडे यांनी घेतली आरोग्य उप सचिवांची भेट

धारूर : आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रयत्नामुळे रूई धारूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेले असून ते कार्यान्वीतही झालेले आहे. परंतू अद्याप काही समस्या आहेत.त्या दूर करण्यासाठी प्रा.ईश्वर मुंडे ( प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल) हे पाठपुरावा करत आहेत.
प्रा.आरोग्य केंद्र रूई येथे जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद,बीड यांच्या उपस्थीतमध्ये येथे आरोग्य सेवा आढावा बैठक लावली होती. या बैठकीमुळे अनेक समस्यांचे निवारण झालेले आहे. परंतू सदरील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्र डी.डी.ओ.कोड नसल्यामुळे अस्थापनेची कामे,सादिलवार खर्च,रूग्ण वाहीकेचा डीझेल व ईतर खर्च,कर्मचाऱ्याचे वेतन या बाबतच्या समस्या कायम आहेत. रुई धारुर व चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्र डी.डी.ओ.कोड मिळावा म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.बीड यांनी जा.क्र.१७/२२ दि.५/१/२०२२ रोजी उप सचिव,ग्राम विकास व जल संधारण,महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्र पाठवलेले आहे परंतू अद्याप या बाबत कोणती ही कार्यवाही न झाल्याने प्रा.ईश्वर मुंडे यांनी मुंबई येथे जावून श्री मनोज जाधव, उप सचिव ग्राम विकास व जल संधारण यांची भेट घेतली.या प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली.
रूई धारूर व चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन डी.डी.ओ.कोड काढून देणे बाबत ची प्रक्रिया लवकरच पुर्ण करू असे अश्वासन मनोज जाधव, उप सचिव ग्राम विकास व जल संधारण यांनी दिले. असल्याची माहिती मुंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.