टेलिफोन कार्यालयासमोर तरुणांचे गांधीगिरी आंदोलन
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात विज पुरवठा बंद झाली की, जिओ आणि बीएसएनएल कंपनीच्या मोबाईलची रेंज गायब होत असून ग्राहकांची ही फसवणूक असल्याने तरुणांनी कार्यालयाला हार घालून गांधीगिरी आंदोलन करत लक्ष वेधले आहे.
आठ दिवसापासून पिंपळनेर परिसरात जिओ आणि बीएसएनएल कंपनीच्या मोबाईलधारक ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विज गेली की रेंज जात असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. सध्या मोबाईल अत्यावश्यक सेवेत येत असून तो रेंज राहत नसल्यान बिनकामाचा ठरत आहे. तसेच व्यवसाईक लोकांनाही संपर्क बंद पडल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधीत कंपनीने याकडे लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी व या समस्येकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी दि.6 फेब्रुवारी, रविवारी सकाळी या कार्यालयाला पुष्पहार घालून तरुणांनी गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी उपसरपंच राजेश गवळी,माजी जि.प.सदस्य मनोज पाटील, भागवत कदम, श्रीकांत ठोकरे, उमेश आनेराव परमेश्वर ठोकरे, गणेश तांबे, गोकूळ गवळी, भागवत ठोकरे, मच्छिंद्र साठे, सचिन भुजबळ, बोधे, नरवडे, सह आदी तरुण उपस्थित होते