टेम्पोची दुचाकीला धडक अंबाजोगाईचे पिता- पुत्र जखमी
नेकनुर : बीड-केज रस्त्यावरील येळंब ( घाट ) जवळील साळवण्या पुलावर एका दुचाकीला टेम्पो ने जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पिता-पुत्र जखमी झाल्याची घटना आज ( दि. १९ ) दुपारी घडली. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले.
शेख जमील शेख अजीज (वय ६२ वर्ष) रा . गांधी नगर , अंबाजोगाई, मुस्तखिम शेख (वय १० वर्ष ) असे जखमींची नावं आहेत. हे दोघं दुपारी २ च्या सुमारास बजाज डिस्कव्हर या दुचाकी वरून नेकनूरकडे जात होते . दरम्यान अतिवेगात असलेल्या आयशर टेम्पो क्र . एम . एच . ४४ यू . ७४८६ ने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीवरील शेख जम्मील शेख अजीज यांना मार लागल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. १० वर्षीय मुस्तखिम याच्याही डोक्याला मार आहे . अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्या ऐवजी चालकाने टेम्पोसह धुम ठोकली. पळून जात असलेल्या टेम्पोला आडविण्याचा काही तरुणांनी प्रयत्न केला. पण चालकाने त्यांच्याही अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांना जखमींना तात्काळ उपचारासाठी नेकनूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु जखमींची प्रकृती गंभीर असल्याने प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले.