टेन्शन वाढलं देशात एकाच दिवशी ओमिक्रॉनचे १७ रुग्ण आढळले
देशात रविवारी एकाचवेळी ऑमिक्रॉनचे १७ नवीन रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक रुग्ण राजस्थानमध्ये आढळले आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असून त्यापैकी ४ जण दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत.त्यांच्या संपर्कात आलेल्या५ जणांना ही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
या आधी महाराष्ट्रात पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीत सकाळी एक रुग्ण आढळून आला आहे. यानुसार ओमिक्रॉनच्या देशातील रुग्णांची संख्याही २१ वर गेली आहे.
राजस्थानातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या कुटुंबातील चौघे २५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि मुंबईहून जयपूरला आले . या सर्वांचे करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वॉरंटाइन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आलेल्या ७ जणांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. ७ पैकी ४ जण हे विदेशातून परतले आहेत. ३ जण त्यांच्या संपर्कात आले. त्यांचीही टेस्ट केली गेली. त्यात तिघेही पॉझिटिव्ह आढळून आले.
दिल्लीत रुग्ण ही विदेशातूनच आलेलला
दिल्लीतही टांझानियातून आलेल्या तरुणाला ऑमिक्रॉनचा संसर्ग असल्याचं समोर आलं आहे. त्याला एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घशात सूज, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे त्याच्यात दिसून आली आहेत.