टॅम्पोची दुचाकीला धडक;शिक्षक जखमी
केज-कळंब रस्ता ठरतोय अपघाती मार्ग
केज
साळेगाव येथून केजकडे जात असलेल्या दुचाकीची व समोरुन येणाऱ्या टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात शिक्षक जखमी झाले. सदरील घटना गित्ते वस्तीजवळ केज-कळंब रस्त्यावर आज सकाळी १० च्या सुमारास घडली.
केज येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे सहशिक्षक बालासाहेब जोगदंड ( वय ४८ वर्ष ) हे साळेगाव ( ता.केज ) येथून दुचाकी क्र . एमएच -४४ / व्ही -५२४४ वरून केजकडे जाताना केज कडून कळंबच्या दिशेने जात असलेलं टेम्पोने क्र . एमएच -१३ / जी -२२० ९ चालकाने टेम्पो चुकीच्या दिशेने चालवून दुचाकीला धडक दिली. यात बालासाहेब यशवंत जोगदंड ( रा . फुले नगर केज ) यांच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागल्याने जखमी झाले. यावेळी येथून जात असलेले वसुंधरा शाळेचे शिक्षक दिपक उबाळे आणि जनक वाघमारे यांनी जखमींना मदत करत स्वतःच्या गाडीतून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . येथे प्रथमोउपचार करुन पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले.