टिप्पर व स्कॉर्पिओच्या धडकेत मुलगा ठार; धारूर-तेलगाव रस्त्यावरील घटना

लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील एक कुटुंब माजलगाव येथून लग्न उरकून परत येताना धारुर-तेलगाव रस्त्यावर भोगलवाडी फाट्यावर टिप्पर व स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात एक १२ वर्षाचा मुलगा ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अक्षय उर्फ सोनु अशोक हंडीबाग ( वय १२ वर्ष ) रा. चिंचपूर ( ता. धारुर ) असे अपघातातील मयत मुलाचे नाव आहे. चिंचपूर येथील हंडीबाग कुटुंब स्कॉर्पिओ या वाहनाने लग्न सोहळ्यासाठी माजलगाव येथे गेले होते. लग्न आटपून परत येताना तेलगावच्या दिशेने चाललेला टिप्पर क्र. एम.एच. ४४ यू ९३०९ ने समोरुन येत असलेल्या टिप्परला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये अक्षय या मुलाचा मृत्यू झाला. दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून धारुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.