ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा
आडस व परिसरातील २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये इयत्ता 10,12 परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करुन या विद्यार्थ्यांच्या पाटीवर शाबासकीची थाप मारण्यात आली.
बीड येथील कुटे ग्रुपची मराठवाड्यातील पहिली ज्ञानराधा मल्टीस्टेट या नावाजलेल्या संस्थेची आडस ( ता. केज ) येथे शाखा आहे. या संस्थेचा नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्याला प्राधान्य असते. गुणवंत विद्यार्थ्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे म्हणून शनिवारी ( दि. 17 ) सकाळी 11 वाजता शाखेत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी आडस, खोडस,वाघोली, मोरफळी, सोनवळा येथील इयत्ता 10, 12 बोर्डाच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन पाठीवर शाबासकीची थाप मारण्यात आली. यावेळी एकूण 25 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजपा नेते अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांची व धारुर पो.स्टे. चे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बब्रुवान ढोले, सरपंच बालासाहेब ढोले, शिवरुद्र आकुसकर, सुभाष ढाकणे, प्रशांत चव्हाण, रामभाऊ किर्दक, अनंत शेळके, अनुरथ मुळे, गोविंद बाहेती, शेख असेफ, रामदास साबळे, गजानन देशमुख, किशोर माने, परमेश्वर इंगोले सह आदिंची उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह, पुष्प हार, शॉल व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.