भवताली
जैनब या 4 वर्षांच्या चिमुकलीचा पहिला रोजा
लोकगर्जनान्यूज
गंगाखेड : येथील जैनब चांदपाशा शेख या 4 वर्षांच्या चिमुकलीने सोमवारी ( दि. 27 ) आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. याबद्दल तिचे सर्वातून कौतुक होत आहे.
सध्या रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. मुस्लिम बांधव या पुर्ण महिनाभर रोजा ठेवतात. परंतु मागील काही वर्षांपासून रमजान उन्हाळ्यात येत असल्यामुळे अनेकजण उष्णता व उन्हाला घाबरून रोजा ठेवण्यासाठी ना..नु.. करताना दिसतात. परंतु लहान – लहान मुलं मोठ्या धैर्याने रोजा पुर्ण करत आहेत. आडस येथील शिक्षक चांदपाशा शेख यांची नात जैनब चांदपाशा शेख ( वय 4 वर्ष ) रा. गंगाखेड ( जि. परभणी ) हिने आयुष्यातील पहिला रोजा सोमवारी पुर्ण केला. याबद्दल जैनबचे आई, वडील, दोन्ही आज्जी,आजोबा, मामा सह आदींनी कौतुक केले.