जि.प. शिक्षकाचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन आयुष्य संपवलं
लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने टोकाचा निर्णय घेऊन गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना आज मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ९:३० वाजता आसरडोह ( ता.धारुर ) येथे घडली. घटनास्थळी आडस पोलीस चौकीचे सिद्धेश्वर सचिन धाव घेतली आहे.
धारुर तालुक्यातील दहिफळ केंद्रांतर्गत असलेल्या कासारी बोडखा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले नितीन लक्ष्मण पाटुळे रा. आसरडोह ( ता. धारुर ) यांनी आज मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडले व सरळ गावच्या पुर्वेस घरापासून काही अंतरावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात घटना समजताच पुर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलीसांना देताच आडस चौकीचे पोलीस कॉ. सिध्देश्वर सचिन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात पाठवून दिला. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयताच्या पश्चात आई -वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.